पाथरी तालुक्यातील हे गाव पाथरीच्या अग्नेय दिशेस सुमारे सहा किलोमिटर अंतरावर गोदावरीच्या तिरावर वसलेले आहे. येथे असलेल्या रत्नेश्वराच्या मंदिरामुळे गावास रत्नेश्वर रामपुरी म्हणतात. गोदावरीच्या तिरावर उंच ठिकाणी मंदिर असुन मंदिरात श्री भगवान रामचंद्र थांबले होते प्रभू रामचंद्रांनी आपल्या वास्तव्यात येथे शंकराच्या पिंडीची प्राणप्रतिठा केली.

पिंडीवर अभिषेकासाठी पाण्याची आवश्यकता होती म्हणुन प्रभुरामचंद्रानी बाणाच्या साह्याने उंचावर पाणी काढले. आजही एवढ्या उंचीवर महादेवाच्या पिंडीच्या कंठात व नाभीत सतत पाणी असते. छत्रवती शाहूमहाराजांनी येथील ब्राम्हणांना ताम्नपत्रे देऊन गौरविल्याचा उल्लेख आहे. तसेच निजाम सरकारनेही इनाम बहाल केले होते.

 
 
 
 
 
 
पहिले पान श्री साईबाबा पाथरी शहर पाथरी तालुका अत्यंत महत्वाच    
 
 
 
 
संकेतस्थळाची निर्मिती: www.pame.in साईबाबा जन्मस्थान पाथरी संकेतस्थळाचे सर्व हक्क सुरक्षीत आहेत.