पाथरी तालुक्यातील हे ऐतिहासिक गाव पाथरीच्या आग्नेयेला सुमारे १९.२ कि.मी.अंतरावर असून ते गोदावरी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर बसलेले आहे.गावात हिंदूची तीन मंदिरे व एक मठ आहे.मुदगलेश्वर मंदिर प्रसिद्ध असून आषाढ वध्य चतुर्दशीला मुद्गालेश्वराची जत्रा भरते.

काहीच्या मते या गावाचेमुळ नाव वडगाव असावे.नंतर मुद्गल ऋषीच्या वास्तव्यावरून गावास मुदगल हे नाव पडले असावे.पुत्रप्राप्तीसाठी या ठिकाणीचे विशेष महत्व आहे.असे भाविक लोक मानतात.शंकराने पुत्रप्राप्तीसाठी या ठिकाणी पार्वतीसह भेट दिली होती,अशी अख्यायीका भविषोत्तर पुराणमध्ये आहे.मुद्गल ऋषीच्या अनुग्रहाने शंकराला गणपती झाला असे म्हणतात.आपल्या क्रोधायमान स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या दुर्वास ऋषींना सुद्धा मुदगल ऋषींनी संतुष्ट केले.दुर्वास ऋषी त्यांची परीक्षा घेण्याकरीता आले होते.राम व श्रीकृष्णसुद्धा येथे भेट देवून गेले आहेत.मुदगल पासून अर्ध्या कि.मी.अंतरावर उंच ठिकाणी मुदगलेश्वराचे मंदिर आहे.त्या ठिकाणी गोदावरीच्या पात्रात अहिल्याबाईनी बांधलेलेमंदिर आहे.असे सांगतात.मंदिराच्या प्रवेशद्वाराची खालील आशयाचा शिलालेख आहे.श्री गणेशाय नम: श्री मुदगली विजुयते स्वस्तेश्री नुप शालीवाहन शके षडमिस पोहंवी १७१६ संख्याते विधिविषयी प्रथमम् श्वनद संवत्सर तंत्र श्री मुनी मुदगलस्य बहुश:कोणादिप्तितिहित प्रासद: खलुगोह या परिवृत: सिध्दीमनोवज्जवत १ शुभं भवतु सर्वेषां जनानाम् ।।
मंदिरात मुदगल ऋषी त्यांची पत्नी सरस्वती,पुत्र मौदगल्य आणि स्नुषा यांच्या अतिप्राचिन मुर्ती आहेत. मंदिराच्या बाजुस गोदावराच्या पात्रातच उत्तरेस गणपतीचे मंदिर आहे. गावात खंडेश्वराचे मंदीर आहे. हे मंदिर गोदावरीच्या पात्रातील मंदिराचे समकालीन असावे असे वास्तूशिल्पावरून वाटते. या मंदिराच्या परिसरात बांधेश्वर,रामेश्वर ,ओकालेश्वर ,पुत्रेश्वर आदी महादेवाचे मंदिरे आहेत. येथे भारती गोसाव्यांच्या ३०० वर्षापुर्वीचा मठ आहे. या मठातील पाच समाध्या वास्तूशिल्पाचे नमुने आहेत. हा मठ भारती गोसाव्याचा असल्याने भिंतीवरील चक्रे व साखळी वरून सिध्द होते. त्या शिवाय येथे नागुबादेव ऋषिकेशवानंद यांची सुध्दा समाधी आहे. गोदावरीच्या काठावर आठ तिर्थे आहेत. तारा तिर्थ,पुत्र तिर्थ , दुर्वास तिर्थ, लक्ष्मी तिर्थ ,विधी तिर्थ, विष्णु तिर्थ , नृसिंह चक्र तिर्थ शिवरात्रीस येथे मोठी यात्रा भरते त्या शिवाय आषाढ महिन्यात मोठा उत्सव साजरा केला जातो. मुदगल येथे पुत्र प्राप्तीसाठी नागबळीचा विधी केला जातो. नागबळी हा विधी करण्यासाठी दुरवरून असंख्य भाविक येथे येत असतात. हा विधी पार पाडल्याने पुत्र प्राप्ती होते अशी भाविकांची श्रध्दा आहे.

 
 
     
     
     
 
 
 
 
पहिले पान श्री साईबाबा पाथरी शहर पाथरी तालुका अत्यंत महत्वाच    
 
 
 
 
संकेतस्थळाची निर्मिती:www.pame.in साईबाबा जन्मस्थान पाथरी संकेतस्थळाचे सर्व हक्क सुरक्षीत आहेत.