श्री विश्वास खेर हे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री (१९३७-१९३९, १९४६-१९५२) कै. बाळासाहेब खेर यांचे सर्वात धाकटे चिरंजीव. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९२४ साली, मुंबई येथे झाला. त्यांचे  सुरवातीचे सर्व शिक्षण मुंबई येथे  झाले. ते लोन स्कॉलरशिपवर १९४६ साली लंडन येथे  गेले व त्यांचे पुढील शिक्षण १९४७ पर्यंत तेथे पुरे झाले.

फेब्रुवारी १९७२ साली त्यांची प्रथम शिर्डीस भेट -१९७४ साली ते शिर्डीस आपल्या बंधूसह गेले असता त्यांचे तेथे तत्कालीन कोर्ट रिसिव्हर

 श्री काशिनाथ पाठक यांची गाठ पडली असता त्यांचे सुचने वरून ते त्याचं वर्षी नोव्हेंबर मध्ये श्री स्वामी साई शरणानंदयांना त्यांच्या अहमदाबाद

 येथील मठातभेटले असता ते फार प्रभावित झाले. स्वामीजींच्या संपर्कात व सहवासात पुढील आठ वर्ष  म्हणजे १९८२ पर्यंत स्वामीजी समाधी घेईपर्यंत ते होते या थोर संताच्या अशीर्वादानेच विश्वास खेरच्या हस्ते साईबाबा संबंधी जे कार्य घडले ते त्यांचे फळ होय.१९८४ ते १९८९ या कालखंडात साईबाबा  शिर्डी संस्थानाचे ते  विश्वस्त होते प्रकाशन व रिक्रुटमेंट या उपसमितीचे अध्यक्ष होते .

मराठवाड्यातील पाथरी या  गावी श्रीसाईचा जन्म झाला या संबंधी त्यांनी संशोधन केले. त्यांचे फळ म्हणजे श्री साईच्या जन्मस्थानी १९९९ येथे त्यांचे चन्नई येथील संगणक उद्योगातील दानशूर उद्योगपती श्री रमनी यांच्या उदारतेमुळे मंदिर उभारले गेले व त्यांचे २००९ मध्ये दस-याच्या
महुर्तावर दशकपूर्ण झाले आहे.

 
 
 
 
 
 
पहिले पान श्री साईबाबा पाथरी शहर पाथरी तालुका अत्यंत महत्वाच    
 
 
 
 
संकेतस्थळाची निर्मिती :www.pame.in साईबाबा जन्मस्थान पाथरी संकेतस्थळाचे सर्व हक्क सुरक्षीत आहेत.