०१ कुंभारवाडी (पंचबावडी) मारोती :-श्री संत साईबाबांच्या घरचे कुलदैवत आहे. श्रीसंत साईबाबा मंदिरापासून पश्चिमेस साधारण दोन कि.मी अंतरावर असून श्री मारोतीची मुर्ती पुरातन आहे.शेजारीच पुरातन पुष्कर्णी (बारव) तिर्थ असून हा मारोती नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे.
०२ पाथरीचा किल्ला:-श्री साईबाबा मंदिराच्या दक्षिणेस साधारण तीन कि.मि.अंतराव नामदेव नगर-पुरा परीसरात हा किल्ला आहे.हा किल्ला भग्नावस्थेत असून काही शेष भाग अध्यापही शिल्लक आहे.किल्ल्यावर दोन विहारी ,प्रवेश दाराचा काहीभाग शिल्लक आहे.जवळजवळ सहाशे वर्षापुर्वी किल्ल्यावर असलेल्या वास्तूचे हजरत सय्यद शाह हमीदोद्दीन सामानी रहेमतुल्ला अली (हे इराणचे शहर सामान या ठिकाणाहुन इस्लाम धर्माच्या प्रचारासाठी पाथरीला आले होते.त्यांचा मकबरा या किल्यातील वास्तूत केला आहे). दर्गात रूपांतर करण्यात आले .असा उल्लेख महाराष्ट्र शासनाच्या गझेट मध्ये आढळतो दर्गाला एकुण बारा खांब असून त्यावर एक घुमट आहे.दर्ग्याच्या चारही कोप-यात प्रचंड खांब आहेत.हे खांब आणि घुमट यांचे काम अतिशय सुबक आहे.दर्ग्याच्या आतील बाजूवर सुंदर नक्षीकाम असून त्यावर हिंदू शिल्पकलेची बरीच छाप पडलेली दिसते.दर्ग्यास चार प्रवेशद्वार असून त्यापैकी तीन बुजलेले आहेत दर्ग्याभावती भिंतीमध्ये सर्वत्र कानोडे आहेत.दर्ग्याच्या आकार अष्टकोनी आहे.घुमट अंदाजे साडेनऊ मीटर उंचीचा आहे.सध्या किल्ल्यावर लोकांनी वस्ती केल्यामुळे किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे
०३ श्री दत्त मंदिर:-श्री दत्तगुरूच्या अंशावतार म्हणून प्रसिद्ध असलेली श्री प.पू.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी चौधरी गल्लीतील दत्तात्रयाची स्थापना केली आहे.श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी चौधरी वंशातील काही व्यक्तींना अनुग्रह सुद्धा दिलेला आहे.त्यांच्या स्वहस्ताक्षरातील पत्र आजही चौधरी घराण्यातील काही व्यक्तीजवळ आहे.
०४ केदारेश्वर महादेवाचे देऊळ :-हे देऊळ सव्वा पाचशे वर्षापूर्वीचे असून देशमुख गल्लीत आहे.देवळाची बांधणी मजबूत दगडात असून त्याला पाथरीमधील दर्ग्यासारखे घुमट आहेत.देवळाच्या गाभा-यात महादेवाची दोन लिंगे एकमेकाजवळ ठेवण्यात आलेली आहेत.त्यांच्या बाजूला हातामध्ये दिवा असलेला पुतळा होता.दर्शनी भिंतीवर नृत्यकरणाऱ्या आणि आनंदात बेभान झालेल्या स्त्री-पुरुषाच्या अतिशय उत्कृष्ट मुर्ती कोरलेल्या आहेत.भिंतीच्या खालच्या बाजूला गरुड आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत.बाहेरच्या बाजूला सभामंडप असून त्याला पाच खांब आहेत.त्यातूनच बाहेरच्या पटांगणात जाण्यासाठी रस्ता आहे.बाहेरच्या पटांगणात दोन्ही लिंगाच्या समोर दगडामध्ये कोरलेला आणि चबुत-यावर बसविलेला नंदी आहे
०५ पुरातन बालाजी मंदिर :श्री संत साईबाबां मंदिरा पासून जवळच दक्षिणेस लेंडी ओहोळ जवळ पुरातन बालाजी मंदिर असून हे श्री क्षेत्र देवुळगाव राजा (जि.बुलढाणा ) येथील बालाजी मंदिरातील मुर्ती सदृस्य असल्याचे सांगण्यात येते.
०६ सोमेश्वर मंदिर व बालाजी मंदिर :- श्री संत साईबाबा मंदिराजवळील वैष्णव गल्लीत मंदिर असून पुरातन असे मंदिर आहे.याच मंदिरात श्री विष्णु(बालाजीची) पुरातन मुर्ती आहे.या मंदिराच्या परीसरात वैष्णवाची वस्ती असल्यामुळे या गल्लीचे वैष्णव गल्ली असे नाव मिळाले.श्री सोमेश्वर महादेव जागृत देवस्थान आहे.
०७ लिंगायत मठ (पाथरी) :- पाथरी शहरात लिंगायत मठ असून श्री कांचबसवेश्वर स्वामी यांनी जिवंत समाधी घेतली असे भाविक भक्त मानतात. मठ दोन एकराच्या भव्य जागेत उभारला असून मठाचा कारभार सुस्थित राहावा म्हणून निजाम सरकारने ब-याच जमिनी इनाम म्हणून दिल्या आहेत.असे कागदपत्रावरून दिसून येते.या लिंगायत मठाच्या अधिपत्याखाली शिरडशहापूर(जि.हिंगोली) जवळा बाजार,अमरावती ,नांदुसा (नांदेड जिल्हा) व औंढानागनाथ (हिंगोली जिल्हा) येथील मठ असल्याची माहिती प्रत्यक्ष मुलाखतीत काशिनाथ शिवाचार्य महाराजांनी दिली आहे.मठाचा कारभार गुरुशिष्य परंपराने सुरू असून आता श्री पं.पू.षटस्थलब्रमम्ही १०८ बसवलिंग शिवाचार्य गुरू काशीनाथ शिवाचार्य लिंगासत मठाचा कारभार पाहतात.
०८ लेंडी ओहोळ ::-पाथरी शहरात लेंडी ओहोळाचे दोन प्रवाह असून एक वैष्णव गल्ली जवळ आहे तर दुसरा श्री संत साईबाबा मंदिराच्या दक्षिणेस पुरातन बालाजी मंदिराजवळ आहे .हा लेंडी ओहोळ आता नामशेष झाला असून तेथे सिमेंट रस्त्याचे बांधकाम झाले आहे.  
०९ सैय्यद शहा इस्माईल शरीफ काद्री रहेमतूल्ला साहेब यांचा दर्गा- हा दर्गा दोनशे वर्षापुर्वी बांधण्यात आला असे म्हणातात.रमझान महिन्याच्या बारा तारखेला या ठिकाणी उरूस भरतो .पाथरी शहरची अत्यंत गैरवाची बाब म्हणजे या शहरात इस्लाम धर्माचे चाळीस वली (संत) चार कुतूब व एक अब्दाल अशा महान संतांचे मकबरे आहेत.शेखुल मशाईक पिरी व मुरशिदी व मौलाई  हजरत शाह इस्माईल शरीफ अल कादरी अल मुलतानी रहेमतुल्ला अब्दाल आहेत. या वली (संतांचे) अनेक चमत्कार लोकांनी अनुभवले आहेत. त्यांचे वडील श्री शेखुल मशायख पिरी व मुरपीदी व मौलाई  हजरत शमसोद्यीन शरीफ अल कादरी अल मुलतानी बादशाह हे बीदर कर्नाटकर राज्यात त्यांची मजार कबर आहे.हजरत इस्माईल शाह कादरी यांनी इस्लामचे अध्यात्मिक शिक्षण घेतल्या नंतर त्यांना खिलाफत देऊन त्यांच्या वडीलांनी इस्लामच्या प्रचारासाठी पाठवले. हे संत पायी प्रवास करून आपल्या अनुयांयी सोबत पाथरीला आले आणि पाथरीतच राहीले.या संताचा मोठा मुलगा श्री अब्दुल्ला अकबर व नातु श्री हजरत सय्यद शाह मकदुम कादरी यांचा मकबरा सुध्दा या दर्गाच्या परिसरात आहे.या संताचे दुसरे नातु त्यांच्या आदेशावरून इस्लामच्या प्रसार करण्यासाठी विविध ठिकाणी इस्लामचा प्रचार करत करत विदर्भात निघुन गेले.तसेच यासंताचे वंशज श्री सय्यद अब्दुल रौफ शाह कादरी उर्फ दिवाने मियॉं हे सुध्दा थोर वली (संत)होऊन गेले .यांची कबर सुध्दा याच परिसरात दर्शनासाठी आहे.यासंताचे वशंज आजही पाथरीत राहतात.
१० सय्यद सदत ऊर्फ अमीनोद्यीन शाह रफयी दर्गा - हा दर्गा जवळजवळ सव्वा सातशे वर्षापुर्वीचा असून तो एका मशिदीबरोबर जोडून बांधण्यात आलेला आहे.सभोवार भिंत असून पटांगनात प्रवेश करण्यसाठी चारदरवाजे आहेत. त्यापैकी दर्शनी भागातील दरवाजा सर्वात मोठा आहे.दर्ग्याची बांधणी दगडी असून वरचा भाग विटानी बांधण्यात आलेला आहे.दर्गा आणि मशिदिबाहेर सभामंडप असून खांबाना जोडणा-या सहा कमानी आहेत मशिदीच्या बाहेरील बाजूस डावीकडे १३३४ हिजरीमध्ये बांधलेली एक विहीर आहे मशिदीच्या प्रत्येक कोप-यात एक एक मिनार आहे मुख्य दरवाज्यावर एक मजला असून या मजल्याला देखील चार मनोरे आहेत रज्जब महिन्याच्या सहा तारखेला या ठिकाणी उरूस भरतो त्यावेळी हजारोंच्या संख्येने हिंदू आणि मुसलमान जमा होतात.
११ पाथरी शहरातील चार कुतूब :-
०१) हजरत सय्यद शाह जमालोद्यीन कादरी यांची कबर हजरत सय्यद शाह इस्माईल कादरी यांवे जवळ आहे.
०२) हजरत सय्यद शाह दुल्हे साहब रहेमतुल्ला अल यांची कबर सोनपेठ रोड पाथरी येथे आहे.
०३) हाजी सय्यद शाह अब्दुल रहमान साहब यांची कबर रमना शरीफ येथे आहे.
०४) हजरत सय्यद शाह तुराबुल हक्‍क साहेब यांची कबर एकता नगर बडा कब्रस्थान पाथरी येथे आहे.
 
१२ पाथरी शहरात इस्लाम धर्माचे एकुण चाळीस अवलिया (थोर संत):-पाथरी शहरात इस्लाम धर्माचे एकुन चाळीस अवलिया (थोर संत) होऊन गेले आहेत. यापैकी ज्या अवलिया (थोर संत)ची माहिती उपलब्ध झाली त्यांची माहिती देत आहोत.
०१) हजरत सय्यद शाह हमीदोद्दीन सामानी रहेमतुल्ला अली यांची कबर पाथरीच्या किल्यात आहे.
२) हजरत अमिनोद्यीन सय्यद आदात हे थोर संताचा मकबरा(कबर) पाथरी शहराच्या मध्यभागी मेन रोडवर आहे.
०३) हजरत शाह नुरूल हक्क साहब या थोर संतोची कबर नुर नगर पाथरी येथे आहे.
०४) हजरत सय्यद शाह फेरोज कादरी या थोर संतोची कबर फक्राबाद मोहल्ला पाथरी येथे आहे.
०५) हजरत सय्यद शाह पिर अशरफ साहब कादरी या थोर संतोची कबर दर्गा मोहल्ला पाथरी येथे आहे.
०६) हूजूर शाह या थोर संतोची कबर रहे लाईत मोहल्ला पाथरी येथे आहे.
७) हजरत सय्यद जहॉंगिर शाह उमर गश्त या थोर संताची कबर अरब गल्ली येथे आहे.

०८) हजरत सय्यद शहा शिबली साहेब रहेमतुल्ला अली या थोर संताची कबर बडी दर्गा (मोठा दर्गा)येथे आहे.
०९) हजरत सय्यद गैबी शहा बाबा या थोर संताची कबर कुरेशी मोहल्ला मेन रोड पाथरी येथे आहे.
१०) हजरत सय्यद शहा मिसकीन बाबा ऊर्फ सराटेपीर या थोर संताची कबर मोमीन मोहल्ला साई रोड पाथरी येथे आहे.
११) खडे पिर बाबा रहेमतुल्ला अली यां थोर संताची कबर किल्ला पाथरी येथे आहे.
 
१३ पाथरी येथील मकबरा मस्जीद :-मकबरा मस्जीद ही औरंगजेबच्या आगोदरची आहे.या मस्जीदीचा जिर्णाध्दार औरंगजेबच्या काळात झाला आहे.ही मस्जीद आजही सुस्थितीत असून येथे नमाज अदा केली जाते.  
१४ जुने राम मंदिर :-देवळाची बांधणी सहा फुट उंचीच्या चौथ-यावर करण्यात आलेली आहे.देवळाच्या दर्शनी बाजुला विटांमध्ये बांधलेले चार खांब आहे.देवळाच्या तक्तपोशीला पाच कमानीचा आधार आहे.गाभा-यामध्ये राम,सिता आणि लक्ष्मन यांच्या मुर्ती आहेत.लक्ष्मणाच्या मुर्तीच्या उजव्या बाजुला हनुमान मुर्ती आहे.या सर्व मुर्ती उत्तम संगमरवरी दगडात कोरलेल्या आहेत.राम आणि लक्ष्मण यांच्या हातात धनुष्यबाण आहेत. हे देऊळ अडीचशे ते पावणेतिनशे वर्षापुर्वीचे असावे.  
१५ चौधरी वाडा (गढी) -श्री साईबाबा मंदिराच्या नैरुत्य दिशेस १ कि.मी. अंतरावर १४ व्या शतकात बांधलेली गढी आहे आज ही ,चौधरी घराण्यातील वंशज येथे राहतात .अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक मलीक अहमद (तिम्मभटचा वंशज )यांच्या वंशज(लिंबेकर)यांचा वाडा (गढी) सध्या याच वाड्या शेजारी आहे.  
१६ पांडव कालीन पुष्कर्णी (बारव ):-पाथरी शहरातील दक्षिणेस सध्याचे नामदेव नगर,परिसरातील पुष्कर्णी (बारव ) पांडव कालीन असल्याचे मानले जाते.त्या पुष्कर्णीचा जीर्नोधार हेमाडपंती काळात करण्यात आल्याचे सांगीतले जाते.  
१७ त्रिपिंडी महादेवाचे मंदिर :- श्री साईबाबा मंदिराच्या दक्षिणेस साधारण तीन कि.मि.अंतराव पाथरीच्या किल्ल्या पासून अर्धा कि.मि.अंतराव आहे. या महादेवाच्या मंदिरातील महादेवाला तिन पिंडी आहेत म्हणुन या मंदिरास त्रिपिंडी महादेवाचे मंदिर नाव मिळाले. हा महादेव नवसाला पावणारा आहे असे भाविक माणतात  
 
     
     
     
 
 
 
 
पहिले पान श्री साईबाबा पाथरी शहर पाथरी तालुका अत्यंत महत्वाच    
 
 
 
 
संकेतस्थळाची निर्मिती: www.pame.in साईबाबा जन्मस्थान पाथरी संकेतस्थळाचे सर्व हक्क सुरक्षीत आहेत.