श्री स्वामी साईशरणानंद श्री बल्बबाबा
 
 
 
 
  श्री स्वामी साईशरणानंद
 
 
  श्री संत साईबाबाचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले श्री स्वामी साईशरणानंद होय.त्यांचे संपूर्ण नाव श्री वामनभाई प्राणगोविंद पटेल.त्यांचा जन्म ५ एप्रिल १८८९ साली गुजरात मधील सुरत जिल्यातील इतिहास प्रसिद्ध बार्डोली तालुक्यातील मोटा या गावी झाला त्यांचे वडील श्री प्राणगोविंद लालभाई पटेल हे केंद्रसरकारच्या मीठ खात्यात नोकरीला होते. त्याची आई सौ. मानिगौरी या तत्कालीन शिक्षणतज्ञ श्री तुळसाराम सोमनाथांच्या कन्या होत. त्यांचे आजोबा एक सुप्रसिद्ध तलाठी होते. त्यांच्या आजी नंदकुमार या धार्मिक स्वभावाच्या होत्या.वामनभाईचे प्राथमिक शिक्षण मोटा येथे झाले.१८९६ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी ते त्यांच्या काका श्री रामगोविंद यांच्याकडे राहण्यास आले.त्यांचे काका कलेक्टर ऑफिसमध्ये नोकरीस होते.त्यांनी वामनभाईना रामरक्षा शिकविली व तेव्हा पासूनच श्री वामनभाईचे धार्मिक शिक्षण सुरु झाले. १९०३ सालापासून श्री वामनभाईचे शिक्षण न्यु हायस्कुल मध्ये सुरु झाले. १९०५ मध्ये त्यांनी दहावीची परीक्षा पास केली.
पुढे मुंबईतील प्रसिद्ध इलफीन्स्टन कॉलेज मध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला व बी.ए.ला तत्वज्ञान हा विषय घेवून १९०९मध्ये पदवी संपादन केली.१९११ साली त्यांनी एल.एल. बी.पूर्ण केले.वयाच्या १३ वर्षी श्री अंबाराम कृष्णशंकर शुक्य यांची कन्या कलावती हिच्याशी त्याचा विवाह झाला. बालपणापासून वामनभाई धार्मिक वातावरणात वाढले होते.त्यांचे वडील धारासनाच्या मिठागरावर काम करीत असतांना श्री वामनभाईची प्रकृत्ती अत्यंत खराब होती.तेव्हा तेथे एक फकीर येउन त्याच्या आईस म्हणाला.हा मुलगा फार भाग्यशाली आहे.आई म्हणाली कसला भाग्यशाली त्याला इतके जुलाब होत आहेत की तो दोन चार दिवसाचाच सोबती आहे. असे सर्वाना वाटते.नाही,नाही असे बोलू नका हा खरोखरच फार भाग्यशाली आहे बर !त्याच्या उजव्या कुशीत चामखीळ व उजव्या बाजूस तीळ आहे.सौ.मणिगौरी त्याच्या आईने वामनभाई घातलेले झबलं उंच करून पहिले तर खरच त्याच्या अंगावर फकिराने सांगितलेल्या खुणा होत्या.तेव्हा फकीर म्हणाला हे भस्म देतो ते त्याच्या तोंडात टाका म्हणजे सर्व ठीक होईल व श्री वामनभाईचा आजार पूर्ण बरा झाला.वामन सात वर्षाचा असतांना खेड्याच्या शाळेत शिकत होता ,तेव्हा तो श्रावण किंवा व कार्तिक महिन्यात पहाटे उठून स्नान करी आणि मातोश्री किंवा बहिणीसोबत सोमनाथ महादेवाच्या दर्शनास जाई.त्याला मंदिराबाहेर एक फकीर भेटे,जो त्याची थट्टामस्करी करी,तसेच कधी कधी शाळेत जातानासुद्धा त्याची गाठ पडे.१९११ साली वामनभाई साईबाबांना प्रथम भेटले तेव्हा त्यांना उलगडा झाला की,खेड्याचा फकीर दुसरा तिसरा कुणी नसून ते साईबाबा होते.
एकदा भरबैठकीत साईबाबा हाताचे तळवे थोडे दूर धरून हरीसिताराम दिक्षिताना वामनभाईसंबंधी म्हणाले.अरे ! याला मी पुष्कळ वर्षापासून ओळखतो.हा उंदरायएवढा होता त्या वेळापासून याची माझी ओळख आहे.हि सर्व हकीकत वामनभाईनी आपल्या माऊलीला सांगितली तेव्हा तिने त्यांना धारसणाचा वरील सर्व किस्सा सांगितला.काट यांच्या तत्वज्ञानाच्या अभ्यासाने श्री वामनभाईचे मन विचलित झाले.जितका जास्त विचार त्यांनी केला तितका या दृष्टीचे गूढ उकलण्याची व परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन होण्याची ज्यांची उत्कटता स्वामी विवेकानंदा प्रमाणे वाढली.त्यांच्या वडिलांनी श्री बाळकृष्ण महाराजांकडे नेले त्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची तृष्णा पूर्ण झाला नाही.शेवटी त्यांनी दिनांक १०/१२/१९११ रोजी वामनभाईना शिर्डीस पाठविले श्री वामनभाई साईबाबाना नमस्कार करताच संत साईबाबा ठासून वामनभाईना म्हणाले ईश्वर आहे ! नाही का म्हणतोस ? या भेटीनंतर श्री वामनभाईचे जीवनच बदलून गेले.पुढे १९१३ मध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत वामनभाई शिर्डीस गेले असता त्यांना आज उद्या करीत तब्बल अकरा महिनेसाईबाबानी ठेऊन घेतले.शिर्डी येथील दीर्घ मक्कामात साईबाबा त्यांना रोज चार पाच घरी भिक्षा मागण्यास पाठवीत.पूर्वकर्म नष्ट करण्यासाठी साईबाबानी त्यांच्याकडे गायत्री पुरश्चरण करून घेतले.तसेच त्यांना साधना करण्यास शिकविले.ज्ञानेश्वरी व तत्सम दुसरे ग्रंथ वाचून घेतले व अध्यात्मिक अनुभव दिले इतकेच नव्हे,तर साईबाबा त्यांना प्रेमाने बाबू म्हणू लागले.एक दिवस परवानगी न मागताच आपल्याला उद्या जायचय ह्या शब्दांत साईबाबानी त्यांना अनुज्ञा दिली.शिर्डीतील दीर्घ वास्तव्यामुळे वामनभाईच्या आर्टिकल क्लार्कच्या मुदतीत खंड पडला . मुंबईस परतल्यावर त्यांना पेढीचे जेष्ठ भागीदार जहांगीर यांची भेट घेतली,तेव्हा त्यांना सांगण्यात आले की,पहिले भरलेले तेरा महिने खंड पडल्यामुळे गणता येणार नाहीत व प्रथमपासून पुन्हा आरंभ करून पुरी दोन वर्षे भरावी लागतील.यास सुमारास दोन नौकऱ्या त्यांना सांगून आल्या एक पोलिस प्रॉसिक्युटरची व दुसरी नवसारीतील सी. जे. एन. एल. हायस्कूलमध्ये शिक्षकांची.साईबाबांच्या सल्यानुसार त्यांनी शिक्षकांची नौकरी पत्करून एक वर्ष ती जबाबदारी सांभाळली.नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत ते गुलाबभाई या पेढीच्या दुसऱ्या भागीदारांना भेटले
त्यांनी वामनभाईना मुंबई हायकोर्टाचा सरन्यायाधीशाकडे मुदतीत पडलेला खंड माफ करण्यासाठी अर्ज करण्यास सांगितले.तसा अर्ज केल्यावर सरन्यायाधीशानी खंड माफ करून उरलेल्या फक्त अकरा महिन्यांची मुदत पुरी करण्याचा हुकुम केला.मुंबई हायकोर्टाचा इतिहासात असेदुसरे उदाहरण नाही,असे म्हणतात.१९१६ साली एके दिवशी शिरडीस निघालेल्या काही मंडळीच्या बरोबर बाबांसाठी हार,पुष्प वगैरे साहित्य देण्यासाठी ते रेल्वेस्थानकावर आले,परंतु शिरडीस स्वतः जाण्याची एकदम इच्छा होऊन एका अंगावरील कपड्यानिशी ते शिरडीस गेले व तेथे चांगले तीन आठवडे राहिले.शिरडी येथील त्यांच्या या निवासात बुटीसाहेबांच्या वाड्याचे बांधकाम चालू असताना तेथे जवळ उभे असता,त्याच्या डोक्याखंद्यावर एक मोठा दगड पडला व त्यामुळे काही काळ ते बेशुद्ध होते.बाबांच्या उपचाराने त्यांना थोडयाच वेळात शुद्धी आली व काही दिवसात जखम भरून आली.वरील अपघातामुळे काहीवर्षे ते सॉलिसिटरच्या परीक्षेला बसू शकले नाहीत.पुढे मार्च १९१७ ते जानेवारी १९२१ पर्यंत त्यांनी अहमदाबादच्या मॉडेल हायस्कुलच्या प्रिन्सिपॉल पदाची जबाबदारी संभाळली.काही काळ त्यांनी कांगा व सयानी या सॉलिसिटरच्या पेढीत असिस्टट म्हणून काम केले.नंतर मून सुभेदार यांच्या पायेनियार रबर कंपनीत एक वर्ष काढले.१९२३ च्या नोव्हेंबरात वामनभाई सॉलिसिटरच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.१९५४ ते १९३२ या काळात त्यांनी कायद्याच्या क्षेत्राला आपला बराच वेळ दिला.जानेवारी १९२४ पासून सव्वा वर्ष त्यांनी नानावटी आणि कंपनी ही सॉलिसिटरची पेढी चालवली.नंतर काही महिने चोकसी आणि कंपनीत काम केले व जुलै १९२५ ते सप्टेंबर १९२६ पर्यंत ते परळकर आणि पटेल या पेढीत भागीदार होते.पुन्हा एकदा त्यांना अहमदाबादच्या मोडेल हायस्कुलमध्ये प्रिन्सिपॉल म्हणून काम करण्याची इच्छा झाली.परंतु १९२९ मध्ये ते मुंबईच्या लॉ कॉलेजमध्ये प्रोफेसोर झाले आणि कंपनी व इंसॉलव्हसी ह्या दोन कायद्यावर त्यांनी पुस्तकेही लिहून छापली. एका वर्षानंतर त्यांनी हि नौकरी सोडून कॉफ़र्ड बेली आणि कंपनी या सॉलिसिटरच्या प्रसिद्ध पेढीत १९३२ पर्यंत त्यांनी काम केले.त्यानंतर मात्र त्यांनी मुंबई सोडली ती सोडलीच.१९३५ ते १९५० पर्यंत त्यांनी उमरेठ येथे तेथील हायस्कुलचे प्रिन्सिपॉलपद विभूषित केले.सॉलिसिटर म्हणून किंवा शाळेचे प्रिन्सिपॉल म्हणून काम करताना काय,जरी त्यांनी आपली जबाबदारी लक्ष देऊन उत्तम रीतीने पार पाडली तरी ते संसारात असून नसल्यासारखे होते,कारण हे सर्व करीत असताना त्यांचे चित्त ईश्वरचरणी -गुरुचरणी जडलेले होते.
जून १९२४ ते सप्टेंबर १९२६ ला हा त्यांचा कडक तपश्चर्येचा काळ होता. असे स्वामी साईशरणानंद स्वतः आपल्या आत्मचरित्रात म्हणतात.त्यामुळे व्यवहारिकदृष्ट्या त्यांना जरी म्हणण्यासारखी धनप्राप्ती झाली नाही तरी स्वतःच्या पारमार्थिक प्रगतीबद्दल त्यांना संतोष होता.त्यांच्या पत्नी सौ.कलावतीबहेन १९५१साली देवाआज्ञा झाली.त्यांच्यापासून वामनभाईचा एक मुलगा व एक मुलगी अशी संतती झाली.पैकी मुलाचा अंत झाला.परंतु मुलीला साईबाबांच्या कृपेने चांगले स्थळ मिळाले.त्यांचे नाव सौ.त्रिवेणीबहेन जोशी होते.त्यांची सुद्धा साईबाबांवर निस्सीम श्रद्धा व निष्ठा होती आणि त्यांनी अहमदाबाद येथील साईमंदिरात बरीच सेवाही केली.त्यांचा १ ऑगस्ट १९७८ रोजी मृत्यु झाला.जरी मधून मधून वामनभाई स्फुटलेखन करीत असत व त्यांनी दासगणुच्या साईबाबांवरील दोन पुस्तिकांचे स्तवणमंजिरी व अवर्चीन भक्त व संतलीलामृत यातील ४ अध्याय यांचे गुजरातीत भाषांतर केले होते,तरी त्यांच्या स्वतंत्र लिखाणास १९४६ मध्ये सुरवात झाली, असे म्हणता येईल.त्या वर्षी त्यांनी श्री साईबाबा या नावाने साईबाबांचे गुजरातीत ५११ पानांचे रसाळ जीवनचरित्र प्रसिद्ध केले.हा ग्रंथ इतका मान्यता पावला कि १९६६ पर्यंत त्याच्या ६आवृत्या छापल्या गेल्या. साईबाबांच्या जीवनाची गुरुकिल्ली व त्यातील मर्म समजून घ्यायची ईच्छा असणाऱ्यास हा ग्रंथ म्हणजे एक मेवाच होय!१९५२ मध्ये वामनभाईनी श्री साईलीलाख्यान हा पद्यामध्ये गुजराती ग्रंथ प्रकाशित केला.शिवाय श्री अण्णासाहेब दाभोलकारांच्या श्री साईसच्चरीत्राचे त्यांनी ओवीरुपात मधुर भाषांतर करून गुजरातमधील साईभक्तांना उपकृत करून ठेवले आहे.गुजरातमध्ये सामाजिक,धार्मिक व अध्यात्मिक सद्भिरुची वृद्धिगंत करण्यासाठी सस्तू साहित्यवर्धक कार्यालय,या नावाची संस्था बरीच वर्ष काम करीत आहे.तिच्या मालकीचा एक मोठा छापखाना अहमदाबाद मध्ये आहे.श्री मनु सुभेदार हे त्याच्या निधनापर्यंत या संस्थेचे प्रमुख होते.अखंडानंद म्हणून एक मासिक वरील संस्था काढते आणि स्वस्त,चांगले व विपुल असे वाड्मय गुजराती जनतेला उपलब्ध करून देते.मनु सुभेदारांनी वामनभाईना ११/१२/१९५० पासून या संस्थेत जोडून घेतले.त्यात भगवद्गीता, श्री शंकराचार्य, मनुष्यधर्म, सतीसावित्री, श्री प्रल्हाद, अंबरीश, शुकदेव, गजेंद्रमोक्ष, संत ज्ञानदेव, धर्मकथा, चांगदेव पासष्टी, नित्यपाठ जप असे नामस्मरण, श्री रामकृष्ण वचनामृत, सिद्धांतमाला ही प्रमुख होत. सर्व संसारपाशातून मुक्त होवुन संन्यास घेण्याचा विचार वामनभाईच्या मनात अनेक दिवसापासून घोळत होता.म्हणून ३१ मार्च १९५३ रोजी ते सस्तु साहित्यवर्धक कार्यालायच्या व्यापातून मुक्त झाले. व आषाढ शु.१,१२ जुलै १९५३ रोजी डाकोरला जाऊन संन्यासी मठात संन्यास घेण्याचा त्याचा निश्चय पक्का झाला.
त्या प्रमाणे १२/०७/१९५३ रोजी संन्यास विधी सुरू झाला. व १४/७/१९५३ रोजी तो पुर्ण होऊन वामनरावांनी स्वामी साई  शरणानंद हे नाम धारण केले. हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की, संन्यास घेताना त्यांनी कोणताही गुरू केला नाही.कारण आचार्यांकडून महाकाव्याचा जो उपदेश घ्यावयाचा असतो. तो वामन भाइनां साई  बाबांनी अगोदरच केला होता व हे ज्ञान त्यांना अनुभवासह दिले होते,असे स्वामी साईशरणानंदानी लिहून ठेवले आहे.त्यानंतर ते २९ वर्ष वृती व तपस्व्याचे जीवन जगले.२५ ऑगस्ट १९८२ मध्यरात्र संपून २० मिनिटे झाली व इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे २६ ऑगस्ट गुरुवार सुरु झाला तेव्हा स्वामी साईशरणानंद आत्मतत्वात विलीन होऊन ब्रह्यिभुत झाले. त्याची समाधी अहमदाबाद येथील पुढील पत्यावरआहे.१४/१५ प्रकृतिकुंज सोसायटी ,न्यू शारदा मंदिररोड,श्रेयस हायस्कूलसमोर , अहमदाबाद -३८००१५त्यांच्या निर्वाणानंतर त्यांनी तीन पुस्तके साईनाथाने शरणे (१९८३) ब्रह्य परिमल (१९८६) व सिद्धामृत (१९७८) प्रसिद्ध झाली.ती त्यांच्या ज्ञानाची साक्ष देतात.त्यांना आपल्या पांडित्याचा बिलकुल अभिमान नव्हता,उलट त्यांचे व्यक्‍ितमत्व लोभस व स्वभाव विनयशील होता.साईशरणानंदांची तपश्चर्या दांडगी होती व अधिकारही तसाच होता,हे त्यांच्या सहवासात आलेल्या साईभक्तांना माहित आहेच.त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या. परंतु त्यांनी त्यांचा गाजावाजा कधीच केला नाही.श्री साईसच्चरिताच्या ४० व्या अध्यायात साईबाबांनी डहाणूचे मामलेदार बाळासाहेब देव यांचे उध्यापनाचे निमंत्रण स्वीकारतांना त्यांना कळविले होते की स्वतः बापुसाहेब जोग आणि तिसरा एक येऊन जेवून जातील त्या पैकी तिसरे वामनभाई होते, हे फार थोडया लोकांना माहित आहे.त्या प्रमाणे बंगाली संन्याशाच्या वेशात दोन मुलांसह साईबाबा डहाणूस जावून कसे जेवले व मायच्या पटलामुळे देवाणी त्यांना कसे ओळखले नाही,ती सुरस कथा त्या अध्यायात वर्णिलेली आहे.प्रसिद्धी हि विष्ठेसारखी आहे.अशी त्यांची स्पष्टोक्ती होती.म्हणूनच त्यांनी प्रसिद्धीची झगमगाटात येण्याचे कटाक्षाने टाळले.हि त्यांच्या महानतेची खूण आहे.
 
   
  श्री बल्बबाबा  
 
बल्बबाबा हि व्यक्ती त्यांच्या काळात औरंगाबादमध्ये एक कुतूहलाचा विषय होती.तेथील काही हिंदू त्यांना पाकिस्तानी हेर समजत,तर मुस्लीमसमाजाचे काही लोक त्यांना पोलीस खात्यातील गुप्तहेर मानत: परंतु औरंगाबादेतील गुलमंडी येथील मारुती मंदिरात ते दुपारी येउन बसत.तेथील आसपासचे सर्व जमातीचे लोक त्यांचेकडे एक अवलिया या नजरेने बघत असून.विशेषतः औरंगाबादेतील टुरिस्ट गाईड प्रवाशांना एका अवलियाचे तोंडावरील विलक्षण हास्य दाखविण्यासाठी त्यांचेकडे घेऊन जात असत.श्री वसंत न.लिमये हे सी.आय.डी.इंटलिजन्स खात्यातून ३८ वर्षाच्या सेवेनंतर सिनियर इंटलिजन्स ऑफिसर या पदावर असतांना १९९४ डिसेंबर मध्ये निवृत्त होऊन औरंगाबाद येथेच स्थाईक झाले. ते स्वतः बल्बबाबांना ओळखत असत व त्यांनी बल्बबाबांचे नाव, गाव, पेशा, साधना, सिद्धी, पोशाख समाधी ह्यासंबंधी माहिती कळविली त्यावरून खालील मजकूर संकलित करण्यात आला आहे ते म्हणतात की,बल्बबाबा यांचे संपूर्ण नाव आसाराम यशवंत उर्फ येसुजी बनकर होते आणि त्यांचा जन्म बाबरा या गावी माळी समाजातील एका कुटुंबात झाला.श्री वसंत न.लिमये हे सी.आय.डी.इंटलिजन्स खात्यातून ३८ वर्षाच्या सेवेनंतर सिनियर इंटलिजन्स ऑफिसर या पदावर असतांना १९९४ डिसेंबर मध्ये निवृत्त होऊन औरंगाबाद येथेच स्थाईक झाले. ते स्वतः बल्बबाबांना ओळखत असत व त्यांनी बल्बबाबांचे नाव, गावबाबरा हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात असून ते औरंगाबादच्या उतरेस ५५ कि.मी. अंतरावर आहे. बाबरा या गावी बालाजीचे पुरातन मंदिर तसेच गणपती मंदिर आहे.
आसाराम हे हरणाबाई यांचे पुत्र परंतु त्यांना पुतळाबाई नावाची सावत्र आई सुद्धा होती. साधना, सिद्धी, पोशाख समाधी ह्यासंबंधी माहिती कळविली त्यावरून खालील मजकूर संकलित करण्यात आला आहे ते म्हणतात की,बल्बबाबा यांचे संपूर्ण नाव आसाराम यशवंत उर्फ येसुजी बनकर होते आणि त्यांचा जन्म बाबरा या गावी माळी समाजातील एका कुटुंबात झाला.आसाराम यांचा सौ.कां.मथुरा बाईशी विवाह झाला होता व त्यांच्या पासून त्यांना एक अपत्य झाले. ते मुल दोनमहिन्यांचे असतांना वारल्यामुळे १९४७ साली घरादारचा त्याग करून आसाराम औरंगाबादला गेले. औरंगाबाद येथे ते प्रथम टांगा चालवत असत व नंतर कापड गिरणीत नोकरीला होते. गिरणीत अपघात झाल्याने ती नोकरी सोडून ते नाशिकला गेले,परंतु आरामजीचे पुतणे कचरुजी किसराव बनकर त्यांना नाशिकहुन औरंगाबादला घेऊन आले व आपल्या घरी ठेवले.कचरुजी हे स्टेशन रोडवर न्यू पंजाब हॉटेलमध्ये सुपरवायझर म्हणून काम करत व उस्मानपुर मोहल्यात राहत.त्यानंतर आसारामजी ध्यानधारणा व साधना करण्यासाठी कचनेर येथे गेले.हे ठिकाण औरंगाबादपासून औरंगाबाद-बीड मार्गावर सुमारे ४० किलोमिटर असून तेथे महादेवाचे व देवीचे मंदिरे आहेत. या त्यांच्या साधनेमुळे जरी ते अशिक्षित होते, तरी त्यांना वाचासिद्धी प्राप्त झाली व अभ्यासाने अध्यात्मामध्ये त्यांची चांगली प्रगती झाली असे म्हणतात.त्या अनेकांना प्रत्यय आल्याचे समजते.त्यात वि.बा.खेर हे सुद्धा आहेत.कचनेरहून औरंगाबादला परतल्यानंतर काही काळ त्यांचा मुक्काम कब्रस्तानच्या मोकळ्या जागेवर होता. परंतु तेथे त्यांना समाजकंटकांकडून उपद्रव झाल्याने ते औरंगाबाद येथील पैठण दरवाज्या जवळील कानफाट्या मारुती मंदिरात १९५६-५७ च्या आसपास वास्तव्यासाठी आले.ह्या मंदिराचे छप्पर पूर्वी पत्र्याचे होते व या छपाराखाली बल्बबाबा निजत.आसरामजींचा पोशाख फार विचित्र असे.सोलापूर चादरींचा अथवा घोंगड्यांचा गळ्यापासून घोट्यापर्यंत लांब अंगरखा ते पेहनत.त्यांचे शिरावर वासुदेवासारखी टोपी असे त्या टोपीला अनेक रंगाचे व आकाराचे बल्ब तसेच मोरपिसे, कवड्यांच्या व रुद्राक्षांच्या ,माळा बांधलेल्या असत.दोन्ही हातात ते विविध धातुंचे काडी वैगेरे घालत व पायात मोटारच्या टायारापासून बनविलेल्या फॅन्सी चपला असत. ह्या त्यांच्या पोशाखावरून बल्बबाबा हे नाव त्यांना पडलेले असावे. दुपारी ते गुलमंडीच्या कुठल्या तरी दुकानासमोर येऊन उभे राहत.त्या दिवशी त्या दुकानाची विक्री तेजीत असे असा लोकांचा अनुभव होता.तसेच जवळच एक मेवाती हॉटेल होते.
त्याचा मालक बल्बबाबांना फार मान देई व त्याने आपल्या नोकरवर्गाला सूचना देऊन ठेवली होती की जेव्हा जेव्हा बल्बबाबा हॉटेलात येतील तेव्हा त्यांचा योग्य सत्कार व आदरतिथ्य झाले पाहिजे.
१९८२ च्या सप्टेंबरमध्ये औरंगाबादेतील टुरिस्ट गाईड के.के.जुंबडे वि.बा.खेर व त्याच्या पत्नींना बल्बबाबांना बघण्यासाठी घेऊन गेले होते.अबोल म्हणून जरी बल्बबाबांची ख्याती तरी त्यांनी पाऊन तास अस्खलितपणे खेर दांपत्याला शुद्ध वेदांताचा उपदेश केला व संभाषणात कबिरांचे दोहे,साखी इत्यादींचा युक्त वापर केला.भेटीअंती खेरांनी वाकुन बल्बबाबांना नमस्कार केला व वीस रुपयाची दक्षिणा दिली. तेव्हा रुपये वीस लाखाचे मंदिर पाथरीत तुमच्या हातून उभारले जाईल व देशाच्या सर्व भागांतून तेथे लोक येतील असा आशीर्वाद दिला.साई मंदिर साकार झालेले पाहण्याचे भाग्य खेरांना लाभले हि काय कधि साधी गोष्ट आहे ? बल्बबाबांना यांना दिनांक ७ ऑक्टोंबर १९९१(भाद्रपद कृष्णपक्ष सोमवती अमावस्या) सोमवार रोजी पहाटे सूर्योदयाच्या सुमारास त्यांच्या राहत्या खोलीत म्हणजे प्लॉट नं १५२,गांधी नगर, फायर ब्रिगेडच्या मागे, औरंगाबाद येथे देवाज्ञा झाला. जशी बल्बबाबा जन्मतारीख अथवा साल या बदल माहिती उपलब्ध नाही तसेच अंतसमयी त्याचे वय नक्की किती हे सांगता येत नाही,परंतु अंदाजे ते ८०-८५ च्या आसपास असावे असे म्हणतात.जेथे त्यांना देवाज्ञा झाली त्याच जागी बल्बबाबांची समाधी आहे.त्या समाधीवर असलेल्या खोलीत ते राहत असत.त्यांचा मोठा फोटो व त्यांनी वापरलेल्या वस्तू -पोशाख,पलंग,लाकडी झोपाळा,ताट-वाटी,तांब्या इत्यादी त्या खोलीतच नीट मांडून ठेवलेल्या आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
संकेतस्थळाची निर्मिती:www.pame.in साईबाबा जन्मस्थान पाथरी संकेतस्थळाचे सर्व हक्क सुरक्षीत आहेत.